गणेशोत्सव 2024

Ganesh Chaturthi 2024 : नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी

प्रत्येकालाच बाप्पाच्या आगमनाची आस लागलेली असते.

Published by : Siddhi Naringrekar

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

प्रत्येकालाच बाप्पाच्या आगमनाची आस लागलेली असते. आज गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे. बाप्पाचं आगमन हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतात. आनंदाने गणपती बाप्पाचे वाजत- गाजत स्वागत करतात.

ढोल ताशा, फटाके, अगदी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वजण स्वागत करतात. सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. तसेच लाडक्या बाप्पाची आज घरोघरी मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा केली जाते.

याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसतंय. नागपूरकरांचे आराध्य दैवत तसेच प्राचीन मंदिरांपैकी एक अशी ओळख गणेश टेकडी मंदिराची आहे.

या ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून टेकडीच्या गणपतीचा 350 वर्षे जुना इतिहास आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी